Wednesday, 26 June 2019

खाजगी वाहनांवर "पोलीस" "न्यायाधीश" असे बोर्ड लावण्यास प्रतिबंध

खाजगी वाहनांवर "पोलीस" "न्यायाधीश" असे बोर्ड लावण्यास प्रतिबंध करणारा नऊ वर्षातील तिसरा प्रशासनिक आदेश 2019 काढला आहे.
अशावेळी, आता जनतेने सजग होऊन अशा वाहनांचे फोटो काढून पेपर, फेसबुक ह्या माध्यमातून प्रसिद्ध करून महाराष्ट्र शासनाला ह्या बेमुर्वत न्यायाधीश, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी ह्याशिवाय अन्य शासकीय अधिकारी कर्मचारी ह्यांच्यात शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांचे पालन करण्याची जरब निर्माण केली पाहिजे।

 ही दुर्दैवाची बाब आहे की, कायद्याच्या आधारे जनतेला शिक्षा सूनवणारे न्यायाधीश स्वतःच शासकीय आदेशाची पायमल्ली करून खासगी गाड्यावर "न्यायाधीश" असे बोर्ड लावून प्रदर्शन करत फिरतात.

मग त्यांच्यामुळे कायद्याचे रक्षक म्हणवणारे पोलीस मागे का रहाणार. ते सुद्धा आपल्या खासगी चारचाकी, दुचाकी अशा सर्व वाहनावर(अगदी कुटुंबीय वापरत असणाऱ्या गद्यानाही) सर्रास "पोलीस" व पोलिसीचा लोगो असे सर्व मिरवत फिरतात.

सर्वांचे कारण एकच, खोटी प्रतिष्ठा, पदाचा/ खात्याचा गैरवापर, आपल्या वाहनांना कुटुंबियांना सगळीकडे निर्वेध, बिना पैशाने प्रवेश मिळावा.

खरतर शासनाने १ जून २०१० रोजी व नंतर  १४ फेब्रुवारी २०११ रोजी फेर आदेश काढून ही बंदी कळवली. तरीही कायद्याचे पालक व रक्षक दोघेही हा आदेश पाळत नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या महाप्रबंधकाना तिसरा आदेश आठ वर्षाने काढायची उपरती झाली.

पण खरी गोम अशी आहे की ह्या नियम भंगाबद्दल कर्मचारी सेवा नियमानुसार नियम भंगाबाबत कारवाई करायची ठरवल्यास वेतवाढ रोखणे, पदावनती करणे व मुख्य म्हणजे एवढ्या जबाबदार पोलीस अधिकारी व न्यायाधीशविरुद्ध सेवा नियम व शासकीय कायदे मोडले म्हणून कठोरात कठोर शिक्षा म्हणून नोकरीतून बडतर्फही करणे आवश्यक आहे. तरच प्रशासनिक नियम पाळणे आवश्यकच आहे, ही जरब सर्वच शासकीय कर्मचारी, अधिकारी ह्यांना बसेल.

अन्यथा ह्या आदेशालाही केराची टोपलीत दाखवली जाईल.

म्हणूनच आता जनतेने सजग होऊन अशा वाहनांचे फोटो काढून पेपर, फेसबुक ह्या माध्यमातून प्रसिद्ध करून शासकीय अधिकारी कर्मचारी ह्यांच्यात जरब निर्माण केली पाहिजे।

Monday, 8 April 2019

महाराष्ट्रात भाजप शिवसेना युती २०१४च्या लोकसभा निकालाची पुनरावृत्ती करणार !



महाराष्ट्रात भाजप शिवसेना युती २०१४च्या लोकसभा निकालाची पुनरावृत्ती करणार !

गेल्या निवडणुकी प्रमाणेच ह्या लोकसभा निवडणुकीतही भाजप- शिवसेना युती मोठ्या प्रमाणावर जागांची लूट करते का ह्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युतीने आपल्या निवडणुक प्रचार मोठ्ठा वाजत गाजत कोल्हापूर येथून गेल्या निवडणुकीप्रमाणेच सुरू केला आहे.
आजकाल निवडणूक म्हटल्या की सुरुवात जनतेच्या नाराजी ऐवजी विविध बाशिंगधारी उमेदवारांच्या नाराजी दूर करण्यातून होत असते, तशीच सुरवात यंदाहीहोत आहे.
एकीकडे जनतेत विविधांगी अपेक्षांभंगाचे दुःख, वाढती दुष्काळाची तीव्रता, ह्यामुळे निवडणुकीचे वातावरण सर्वत्र बिघडलेले आहे. दुसरीकडे मागच्या निवडणुकीत ४८ पैकी ४२ जागा जिंकत भाजप शिवसेना युतीने विरोधकांचा सुपडा साफ केला होता. आताही भाजप शिवसेना युतीला अशाच किंवा त्याहून जास्त जागा जनतेची नाराजी दूर करत जिंकायचे अपेक्षांचे ओझे डोक्यावर आहे.  आरक्षणाचे विविधांगी गुंतलेले विषय ह्यात भर टाकत आहेत.

पक्षांतर्गत बंडाळी, राजीनामे पक्षबदल ह्यांनी दुबळ्या झालेल्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून किती मतदार आकृष्ट होऊन विजयात रुपयात होईल हे तर अधिक रंजक झाले आहे.
ह्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर ह्यांनी बनवलेली वंचित बहुजन आघाडी दलित व अन्य धर्मियांची किती मते कोणाच्या खात्यातून कमी करते त्यावर थोडी चुरस असणार आहे, एव्हढच.

राज्यातील विविध भागांचा धावता आढावा-
  १. मुंबई ठाणे कोकण
  साडेचार वर्षे स्वतःच्याच सरकारवर प्रचंड विरोधाची धार ठेवणारी शिवसेना अचानक शस्त्र म्यान करून युतीचे गुणगान करू लागली. नेते तरंगताना मात्र मधल्या काळात गृहकलहात लढणारे कार्यकर्ते मात्र धक्क्यातून सावरले नाहीत. पण तोपर्यंत विरोधी पक्ष सोडून युतीकडे येणाऱ्यांची रीघ लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस बेजार आहेत. ज्याचा सरळ फायदा युतीला अपेक्षित आहे.
कोकणात नारायण राणेंचे चिरंजीव मात्र काँग्रेस ऐवजी स्वाभिमानी ह्या राणेंच्या पक्षाकडून लढणार आहेत.
ह्या सर्वामुळे ह्या पट्ट्यात विरोधकांची हार निश्चित आहे.

  २. मराठवाडा व खानदेश -
ह्या दोन्ही भागात दुष्काळाची तीव्रता पर्यायाने शेतकऱ्यांचा रोष असे असले तरी गेल्या निवडणुकी प्रमाणेच युतीला काँग्रेस राष्ट्रवादीतील नात्यागोत्याच्या भांडणाचा व युतीत सामील होण्याचा चांगला फायदा मिळणार आहे. फक्त शिर्डी, नगर भागात उभ्या असलेल्या अपुऱ्या पेन्शनने ग्रस्त पेन्शनरांच्या उमेदवारीने निकालात अनपेक्षित फरक पडू शकतो

  ३.पश्चिम महाराष्ट्र - ह्या भागात गेल्या निवडणुकीतही युतीने ११पैकी ७ जागा जिंकून कथित साखर साम्राटांचे साम्राज्य व अब्रू धुळीस मिळवली होती. आज मतभेदानी अजून जर्जर झालेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसला ह्यातील निदान एक तरी जागा मिळवता येईल का ह्याची खात्री वाटत नाही. अंतर्गत धुसफूस व सातत्याने खेळले गेलेले पाठीतल्या खंजीराचे राजकारण, घराणेशाहिवरील रोष, ह्याने नाराज कार्यकर्ते व मतदार युतीला स्वच्छ स्पष्ठ विजय मिळवून देऊ शकतात.
  ४. विदर्भ - ह्या शेतकरी बहुल भागाने कायम हाल दुर्लक्ष सोसले आहे. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत विरोधकांचा सफया केला होता. पण ह्यावेळी उचलुन धरलेला शेतकऱ्यांचा प्रश्न रोष निर्माण करतोय, तर नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस ह्यांच्या रूपाने विदर्भाला प्रथमच राज्यात व केंद्रात विदर्भाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे राज्यकर्ते दिसत आहेत. त्यांनी आणलेल्या विविध मेट्रो, हायवे, जलसंधारण अशा योजनांही फलद्रुप होताहेत त्यामुळे रोष मतात बदलणे आघाडीला कितपत शक्य आहे ह्यात शंकाच आहे.

एकंदरीत काय, काँग्रेस राष्ट्रवादीने कितीही गोंधळ, कलह निर्माण केले तरी मतदारांचा कौल राष्ट्रशक्ती मजबूत करण्याकडे आहे महाराष्ट्र सांगतोय.

चंद्रशेखर म देशपांडे
9404862747